बार मालकाला पोलिस कोठडी
By Admin | Updated: May 13, 2014 21:06 IST2014-05-13T20:18:31+5:302014-05-13T21:06:19+5:30
बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी अटक केली.

बार मालकाला पोलिस कोठडी
अकोला: जय हिंद चौकातील एका बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालक नितीन वानखडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
जय हिंद चौकातील एका ॲरिस्टो वाईन बारवर महिनाभरापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी छापा घालून बारमधून महाराष्ट्रात बंदी असलेली लाखो रुपयांची विदेशी दारू जप्त केली होती. एवढेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अंधारात ठेवून बार मालकाने पाच वर्षांमध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला. याप्रकरणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. सावेदकर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मध्य प्रदेशातील एका बॅ्रन्डच्या दारू विक्रीला महाराष्ट्रात बंदी असल्यावरही अकोल्यातील जय हिंद चौकातील एका वाईन बारमध्ये या दारूची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने बारवर छापा घालून ३ लाख ३७ हजार ६९६ रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी गोकर्णाबाई वानखडे, नितीन वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींनी अनेकदा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले; परंतु न्यायालयाने आरोपी नितीन वानखडे याला जामीन नाकारला. गोकर्णाबाई वानखडे हिच्या वयाचा विचार करता तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी नितीन वानखडे हा फरार होता. त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी अटक केली.