शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री!

By admin | Updated: October 19, 2014 01:01 IST

अकोला येथे घातक फटाके विक्रीस;फटाक्यांमुळे होतात असाध्य आजार.

विवेक चांदूरकर /अकोलादेशात विक्रीवर बंदी असल्यानंतरही बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची राजरोस विक्री होत आहे. चीनमध्ये बनविण्यात आलेले फटाके घातक असून, यापासून अंधत्व येण्याची दाट शक्यता असून या फटाक्याून निघणार्‍या धुरापासून गंभीर आजार जडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये बनविलेल्या फटाक्यांवर भारतीय बाजारात पूर्ण बंदी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच जाहीर केले; मात्र, त्यानंतरही अकोल्यातील बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री होत आहे. महानगर पालिकेने फटाक्यांची विक्री करण्यासाठी अकोला क्रिकेट क्लबची जागा अधिकृतरीत्या दिली आहे. त्यानंतरही शहरातील गांधी चौकात फटाक्यांची अनेक दुकाने लागली आहेत. या दुकानांमध्ये चिनी फटाक्यांची विक्री होत आहे. चीनमध्ये बनलेल्या बंदुका व त्यातील गोळ्या मिळत आहेत. तसेच काही दुकानांमध्ये प्रसिद्ध असा ह्यपटकबॉम्बह्णही मिळत आहे. बाजारपेठेत शिवाकाशी येथे बनलेल्या फटाक्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे; मात्र त्यासोबतच चायनीज फटाक्यांची विक्री होत आहे. मनपाने तंबी दिल्यामुळे अकोला क्रिकेट क्लबमध्ये असलेल्या दुकानांमध्ये चायनीज फटाक्यांची विक्री होता दिसत नाही. मात्र, शहरातील अन्य बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची विक्री होत आहे.