शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बक-यांनी फस्त केली अडीच लाखांची बोरं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 07:37 IST

अॅसपल बोराची झाडे बकरीच्या कळपाने रातोरात फस्त केल्याची घटना ८ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

अकोट : आधीच शेतकरी अडचणीत असताना नवीन प्रयोग म्हणून शेतामध्ये लावलेल्या अ‍ॅसपल बोराची झाडे बकरीच्या कळपाने रातोरात फस्त केल्याची घटना ८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, याबाबत सदर शेतकऱ्याने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. अकोट तालुक्यातील उमरा येथील दामोदर बोंडे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात विदेशामधून रोपे आणून अ‍ॅयपल बोराची लागवड केली, तसेच इतर पिकेसुद्धा पेरली होती. ७ मे रोजी रात्री शेताचे कुंपण तोडून अज्ञात व्यक्तीने शेतात बकऱ्या सोडल्या. या बकऱ्यांनी शेतामधील अ‍ॅसपल बोराच्या झाडांसह विदेशी फुलझाडे व इतर पिके फस्त केली. ८ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटलासह शेतकऱ्यांनी शेताची पाहणी केली. याबाबत विजय दामोदर बोंडे यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये उभ्या पिकात बकऱ्या चारून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले असून, याबाबत चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात शेतकरी पारंपरिक पिके सोडून उत्पन्न वाढीकरिता नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्याकरिता कर्ज काढून पिके वाढवित आहेत; परंतु काही विघ्नसंतोषी लोक उभ्या पिकामध्ये जनावरे चारून शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बोंडे यांनी केली आहे.