शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मिळणार मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:34 IST

सलग दोन महिने निशुल्क रुग्णसेवा देणाऱ्या आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला : शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना एकट्या जीएमसीवर रुग्णसेवेचा ताण वाढला होता. अशातच पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय तसेच अकोल्यातील रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर जीएमसीच्या मदतीला धावून आलेत. सलग दोन महिने निशुल्क रुग्णसेवा देणाऱ्या आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना येथील आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी निशुल्क रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. वेतनावर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांची स्वॅब घेण्यास माघार घेतल्यानंतर या निवासी डॉक्टरांनी जीवाची परवा न करता कोरोना संदिग्ध रुग्णांचे नमुने संकलित करण्यास सुरुवात केली. सर्वोपचार रुग्णालय तसेच महापालिकेच्या भरतीय रुग्णालयातही आयुर्वेद निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली. यानंतर पीडीकेव्हीमध्येही हे डॉक्टर निरंतर सेवा देत आहेत. सलग दोन महिन्यांपासून कोविड योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे मानधन शासनाकडून दिले गेले नाही. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे गुरुवारी अकोल्यात असताना विद्यार्थ्यांनी मानधन मिळण्यासंदर्भात निवेदन दिले होते. निवासी डॉक्टरांना मानधन मिळावे, यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनीही आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे आग्रह धरला होता. यानंतर आरोग्य मंत्री टोपे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन देण्याचा निर्णय घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांना निर्देश दिलेत. त्यामुळे आयुर्वेद निवासी डॉक्टरांचा मानधनाचा मार्ग मोकळा झाला.

‘त्या’ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होईल मोठी मदतवैद्यकीय शिक्षण घेत असताना कोरोनासारख्या महामारीमध्ये निवासी डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. हे सर्व डॉक्टर मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे मिळणारे मानधन हे त्यांच्या शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे.

४० डॉक्टर देत आहेत रुग्णसेवापातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय तसेच अकोल्यातील रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयातील ४० निवासी डॉक्टर आहेत. विनावेतन रुग्णसेवा देत आहेत. गरजेनुसार यामध्ये आणखी वीस डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत. त्यामुळे आता एकूण ६० आयुर्वेद निवासी डॉक्टर कोरोना महामारीत रुग्णसेवा देणार आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या