गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

By राजेश शेगोकार | Updated: March 7, 2023 15:38 IST2023-03-07T15:38:21+5:302023-03-07T15:38:34+5:30

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंचचा उपक्रम

Awakening of Gurudev thoughts, new initiative of color-free and addiction-free Holi | गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

गुरुदेव विचारांचा जागर, रंगमुक्त व व्यसनमुक्त होळीचा नवउप्रकम

राजेश शेगोकार

अकोला: श्रीगुरूदेव सेवा मंडळा च्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंच च्या माध्यमातून विविध धुलीवंदनच्या दिवशी पर्यावरण पूरक ,रंगमुक्त व व्यसनमुक्त होळी महोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या भजनांनी वातावरण भारून गेले होते.

स्थानिक जांदूरकर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमांमध्ये विचार साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉ सचिन म्हैसणे डॉ रामेश्वर बरगट मानकर दादा, धनंजय मिश्रा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विचार साहित्य संमेलनात झालेल्या जमाखर्चाचा लेखाजोखा सादर करण्यात आला प्रास्ताविकात डॉ. रामेश्वर बरगट यांनी  समितीच्या वतीने आगामी कृतिशील  कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी अकोला जिल्हा राष्ट्रधर्म युवा मंच व राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीचे, ज्ञानेश्वर साकरकार,ऍड,संतोष भोरे,सचिन माहोकार, गोपाल गाडगे,डॉ,प्रकाश मानकर, राजेंद्र झामरे, यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Awakening of Gurudev thoughts, new initiative of color-free and addiction-free Holi