प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:43 IST2020-02-02T15:43:35+5:302020-02-02T15:43:39+5:30

वयापेक्षा १२ वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात जोरात सुरू आहे.

Aunty elope with nephew in Akola | प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!

प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली मामी अन् तिचा पीयूष नामक भाचा दोघेही प्रेमजाळ्यात अडकल्याने सर्वांची आडकाठी दूर करीत ते पळून गेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, या मामीला दोन मुले असताना ती पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मित्र-मैत्रिणी, आंतरजातीय युवक-युवती पळून जाण्याच्या घटना बऱ्याच घडतात; मात्र मामीच्या वयापेक्षा १२ वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात जोरात सुरू आहे.
अनेक दिवसांपासून मामी आणि भाचाचे संबंध असल्याची कुणकुण नातेवाइकांमध्ये होती. यापूर्वी एकदा असाच प्रकार उघडकीस आला होता; मात्र पुन्हा एकदा भाचा स्वत:च्या मामीलाच घेऊन पळून गेला आहे. नातेवाइकांनी या दोघांचाही शोध घेतला; मात्र त्यांचा थांगपत्ता नाही. आता हे दोघे सापडतच नाही म्हणून हैराण झालेल्या नातेवाइकांनी युवकाची आई, त्याचा मामा व आजी या सर्वांनी मिळून पोलिसांची पायरी चढली आहे. विशेष म्हणजे, पळून गेलेल्या मामीला १२ व १३ वर्षांची दोन मुले आहेत. कसलाच विचार न करता या दोघांनी संसार थाटण्याचा घेतला आहे.

Web Title: Aunty elope with nephew in Akola