शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’ रिकामेच; पैशांसाठी नागरिकांची पायपीट

By admin | Updated: May 9, 2017 19:43 IST

खात्यांमध्ये पैसे असतानाही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

अकोला : नोटाबंदीनंतर निर्माण झालेली रोखतेची समस्या अजूनही पूर्णपणे मार्गी न लागल्यामुळे काही अपवाद वगळता शहरास जिल्हय़ातील बहुतांश सर्वच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएममधील पैशांचा ठणठणाट कायमच आहे. खात्यांमध्ये पैसे असतानाही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शहरासह जिल्हय़ात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची ५00 वर एटीएम आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच एटीएम बंद पडले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वच एटीएम सुरू होऊन पैशांची चणचणही राहिली नव्हती. गत महिनाभरापासून मात्र शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट आहे. रिझर्व्ह बँकेकडून जिल्हय़ाच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बँकांच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या शहरातील बहुतांश एटीएम रिकामे आहेत. काही एटीएम मशीन सुरू राहत असल्या, तरी त्यात नोटा नसल्याने नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागत आहे. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील ह्यएटीएमह्ण व खासगी बँकेच्या एक ते दोन एटीएमचा अपवाद वगळता शहरातील बहुतांश एटीएममध्ये दररोजच ठणठणाट पाहावयास मिळत आहे. बँकांचाही आखडता हात एटीएममधून पैसे मिळत नसल्याने नागरिक बँकांकडे वळले आहेत; परंतु बँकांमध्येही पैसे काढणार्‍यांच्या मोठय़ा रांगा कायमच लागलेल्या असतात. हव्या त्या प्रमाणात रोकड प्राप्त होत नसल्यामुळे बँकाही आखडता हात घेत आहेत. खातेदारांना पाच ते दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम दिल्या जात नसल्याचे चित्र अनेक बँकांमध्ये पाहावयास मिळत आहे. आपलेच पैसे आपल्या कामात पडत नसल्याच्या भावना बँक ग्राहक बोलून दाखवत आहेत.