शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

वाद टाळण्यासाठी जमीन एकत्रीकरणाची चाचपणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:13 IST

अकोला : येत्या काळात जमिनीचे तुकडे पडू नयेत, त्यातून चतु:सिमा, रस्त्याच्या कारणावरून वाद होणे, छोट्या तुकड्यांमध्ये विकास कामे करता न येणे, या समस्यांवर उपाय म्हणून जमीन एकत्रीकरण योजना पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली आहे.

ठळक मुद्देवारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहाराने जमिनीचे सतत तुकडे पडत आहेत.शेती कसण्यासाठी अवजारे, खते, बियाण्यांची वाहतूक करण्यातही अडथळे येतात.जमीन एकत्रीकरणाची योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामसभेत ७५ टक्के शेतकºयांनी मागणी केल्यास हा उपक्रम सुरू होणार आहे.

 -  सदानंद सिरसाटअकोला : येत्या काळात जमिनीचे तुकडे पडू नयेत, त्यातून चतु:सिमा, रस्त्याच्या कारणावरून वाद होणे, छोट्या तुकड्यांमध्ये विकास कामे करता न येणे, या समस्यांवर उपाय म्हणून जमीन एकत्रीकरण योजना पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी ग्रामसभेत चर्चेतून योजना राबवण्याचे ठराव मागवण्यात आले. दरम्यान कायद्यानुसार अकोला जिल्ह्यातील ३८९ गावांमध्ये एकत्रीकरण झालेले नाही, त्या गावांना आता संधी देण्यात आली आहे.वाढत्या लोकसंख्येचा भार सतत जमिनीवर पडत आहे. वारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहाराने जमिनीचे सतत तुकडे पडत आहेत. ते केवळ लहानच नाहीत तर इतरत्र विखुरलेल्या रूपातही आहेत. त्या तुकड्यांची शेती कसणे कठीण आहे. त्यातच चतु:सिमा, शेतरस्त्यांवरून सातत्याने वादही होतात. शेती कसण्यासाठी अवजारे, खते, बियाण्यांची वाहतूक करण्यातही अडथळे येतात. त्याशिवाय, तुकड्यांमध्ये विहीर खोदणे, शेततळे, पाण्याचे पाट, चर खोदणे, यांसारखी विकास कामेही करता येत नाहीत. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून शासनाने आधीच ‘मुंबईचे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७’ हा कायदा केला. राज्याच्या पुनर्रचनेनंतर विदर्भ, मराठवाड्यात १ एप्रिल १९५९ रोजी लागू करण्यात आला. त्या कायद्यानुसार राज्यातील ४४३२१ पैकी ३११५१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली. ११७९६ गावांमध्ये ती अद्यापही राबवलेली नाही. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३८९ गावे वंचित आहेत. त्यानंतर १९९३ मध्ये योजना राबवण्यास शासनाने स्थगिती दिली. त्याचवेळी गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी मागणी केल्यास योजना सुरू करता येईल, असाही ठराव घेतला. त्यानुसार जमीन एकत्रीकरणाची योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामसभेत ७५ टक्के शेतकºयांनी मागणी केल्यास हा उपक्रम सुरू होणार आहे.- काय होणार एकत्रीकरणात...गावाचा अधिकार अभिलेख अद्ययावत करणे, तुकड्यांची जमीन अदलाबदल करून त्याचा ताबा संबंधित शेतकºयांना देणे, शेतकºयांच्या जमिनीचा तपशील (खातेदाराचे नाव, गट क्रमांक, क्षेत्र, आकार) दर्शवणारा पंजिबद्ध कागद दिला जाणार आहे.

- ग्रामसभेमध्ये होणार मागणीचा ठरावगावातील जमिनीचे एकत्रीकरण करण्यासाठी ७५ टक्के शेतकºयांनी सहीनिशी मागणीचा ठराव घ्यावा, ग्रामसभेत त्यावर चर्चा व्हावी, याबाबतचे निर्देश २० मार्च रोजीच्या बैठकीत सर्व गटविकास अधिकाºयांना जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिले. त्यावेळी जमीन एकत्रीकरण न झालेली गावे आणि त्यातील खातेदारांची माहिती भूमिअभिलेख विभागाकडून ठरले; मात्र आता केवळ गावांची यादी पंचायत विभागाला देण्यात आली. खातेदारांची संख्या महाभूलेख किंवा महसूल विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. पंचायत विभागाने सर्व गटविकास अधिकाºयांना पत्र देत ग्रामसभा घेण्याचे बजावले आहे. 

जिल्ह्यातील वंचित गावेतालुका           गावेअकोला           ४४अकोट             ४५मूर्तिजापूर      ०६बार्शीटाकळी   १०४पातूर             ९५बाळापूर         २६तेल्हारा          ६९

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी