युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:31 IST2021-05-19T17:31:03+5:302021-05-19T17:31:09+5:30

Crime News : गुढवाले प्लॉट येथील एका युवकावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

Assassination of a youth at Akola | युवकावर प्राणघातक हल्ला

युवकावर प्राणघातक हल्ला

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हमजा प्लॉटमधील गुढवाले प्लॉट येथील एका युवकावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जुने शहर पोलिसांनी सात आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.

हमजा प्लॉट येथील रहिवासी मकसूद बिहारी या युवकावर सात ते आठ जणांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शस्त्राने वार केल्यामुळे मकसूद बिहारी हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना पोलिसांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती खालावल्याने बिहारी यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र देशमुख व पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर आरोपीची धरपकड सुरू केली. नऊ आरोपींपैकी सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. तसेच फरार आरोपींचा शोध जुने शहर पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: Assassination of a youth at Akola