अस्मिता योजना:  जि.प. शाळांमधील विद्यार्थिनींची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:32 PM2018-03-30T13:32:28+5:302018-03-30T13:32:28+5:30

अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची माहिती पाठविली नसल्यामुळे पुन्हा माहिती मागविली आहे.

 Asmita Yojana: information sought from students in schools | अस्मिता योजना:  जि.प. शाळांमधील विद्यार्थिनींची माहिती मागविली!

अस्मिता योजना:  जि.प. शाळांमधील विद्यार्थिनींची माहिती मागविली!

Next
ठळक मुद्देशासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अस्मिता योजना सुरू केली. किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येईल आणि त्यांना माफत दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येतील. सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपवर मुलींना सॅनिटरी नॅपकिन्ससाठी नोंदणी करावी लागणार आहे.

अकोला: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी राज्य शासनाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील मुलींची माहिती शासनाने शिक्षण विभागाकडून मागविली होती; परंतु त्यानंतरही अनेक शाळांनी विद्यार्थिनींची माहिती पाठविली नसल्यामुळे पुन्हा माहिती मागविली आहे. तयार करण्यात आलेल्या एका अ‍ॅपवर शाळांनी सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदवावी लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची घटती संख्या आणि मासिक पाळीदरम्यान अनेक मुली घरी राहतात. काही तर शाळादेखील सोडतात. शाळांमधील विद्यार्थिनींची संख्या कायम राहावी, या दृष्टिकोनातून शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अस्मिता योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाºया ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येईल आणि त्यांना माफत दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपवर मुलींना सॅनिटरी नॅपकिन्ससाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाकडून शासनाने या विद्यार्थिनींची माहिती मागविली आहे. ही माहिती सेवा केंद्रामार्फत अ‍ॅपमध्ये भरावी लागणार आहे. या संदर्भात शासनाने शिक्षणाधिकाºयांना शाळांच्या मुख्याध्यापकांकडून माहिती संकलित करून पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title:  Asmita Yojana: information sought from students in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.