अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:37 IST2020-06-15T16:37:35+5:302020-06-15T16:37:43+5:30
नामाकिंत कंपन्याचे बियाणे मिळणेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा कृत्रीम तुटवडा
अकोला : जिल्ह्यात उपलब्ध बियाण्यांपैकी १७ हजार ४१ क्ंिवटल बियाणे अद्याप विक्री झाली नसताना बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नामाकिंत कंपन्याचे बियाणे मिळणेही कठीण झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.
गतवर्षी जिल्हयात १ लाख ७० हजार ८५८ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. यावर्षी खरीप हंगामात १ लाख ५० हजार हेक्टरचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. परंतु गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे उत्पादन घटल्याने यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने जेवढी तजविज केली त्यातुलनेत आजमितीस महाबीजचे बियाणे बाजारात मिळत नसल्याने शेतकºयांची धावपळ सुरू आहे.
यावर्षी महाबीजकडून जिल्ह्यासाठी ३७ हजार ७७० बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यातील महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे २३,७०७ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यापैकी आतापर्यंत १६,२३२ क्ंिवटलच बियाणे विक्री झाली आहे खासगी कंपन्याकडून १८,५०० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. या तुलनेत २१,६९७ क्ंिवटल पुरवठा झाला.यातील आतापर्यंत विक्री १२,१३१ क्ंिवटल एवढीच झाली आहे.