नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:11 PM2019-09-07T13:11:13+5:302019-09-07T13:11:20+5:30

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला.

The arrival of a new mung increased in Akola APMC | नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

Next

अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला; परंतु दरात चढ-उतार सुरू असून, जास्तीचे दर पुन्हा प्रतिक्ंिवटल ५,६०१ वरू न ५,४११ रुपयांवर खाली आले. असे असले तरी सरासरी दर मात्र प्रतिक्ंिवटल ५,३०० रुपयांवर होते.
यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्याचा परिणाम मूग, उडीद पिकावर झाला आहे. दरवर्षी १५ आॅगस्टपासूनच नवीन मुगाची आवक सुरू होते. तथापि, यावर्षी सप्टेंबर महिन्यात आवक सुरू झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी ५२ क्ंिवटल आवक होती. ६ सप्टेंबर रोजी यात वाढ होत ९२ क्ंिवटलपर्यंत आवक वाढली. दरात चढ-उतार सुरू असल्याने शुक्रवारी मुगाचे कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ४,२०१ रुपये होते.जास्तीचे दर ५,४११ तर सरासरी दर हे ५,३०० रुपयांवर पोहोचले. यावर्षी मुगाचे हमी दर प्रतिक्ंिवटल ७ हजार ५० रुपये जाहीर करण्यात आले आहेत. त्या तुलनेत बाजारात कमी दर आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांनी मूग घरी ठेवल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उडिदाची आवकही ५२ क्ंिवटलपर्यंत पोहोचली आहे. उडिदाला प्रतिक्ंिवटल कमीत कमी ४,६०० जास्तीत जास्त ४,९०० तर सरासरी दर ४,८०० रुपये आहेत. सोयाबीनची आवकही ९३२ क्विंटल होती. सोयाबीनला सरासरी प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये दर मिळाले. हरभºयाची आवकही बºयापैकी ३०८ क्ंिवटल असून, सरासरी दर ३,९५० रुपये होते. शरबती गव्हाचे दर सरासरी दर २,६०० तर लोकल गव्हाचे दर २,१०० रुपये आहेत. लोकल ज्वारीचे सरासरी दर १,८७५ रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.

 

Web Title: The arrival of a new mung increased in Akola APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.