अटक केलेल्या आरोपीला आला अर्धांगवायूचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:38 IST2019-12-17T17:38:25+5:302019-12-17T17:38:30+5:30
लोहारा येथे अवैध मांस विक्री करणाऱ्या शे.सुलतान कुरेशी यास उरळ पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी अटक केली.

अटक केलेल्या आरोपीला आला अर्धांगवायूचा झटका
उरळ : लोहारा येथे अवैध मांस विक्री करणाऱ्या शे.सुलतान कुरेशी यास उरळ पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी अटक केली. पोलीस स्टेशनला आणले असता त्याला अर्धांगवायूचा झटका आला. पोलिसांनी तातडीने त्यास सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले आहे.
लोहारा येथे अवैध मांस विक्री होत असल्याची माहीती उरळ पोलिसांना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून शे.सुलतान कुरेशी यास अटक केली. त्याच्याकडून ८० किला मांस किंमत १६ हजार तसेच दुचाकी किंमत ३० हजार असा ४६ हजार रुपयांचा एवज जप्त केला.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार बायसठाकूर यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय वानखडे, जयेश शिनगार यांनी केली. पोलिसांनी त्याला अटक करून उरळ पोलीस स्टेशनमध्ये आणले. तेथे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. ठाणेदार बायसठाकूर यांनी तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला पाचारण केले. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले. (वार्ताहर)