पुर्ववैमनस्यातून युवकाची हत्या; दाेन तासांत आराेपी जेरबंद

By आशीष गावंडे | Updated: January 13, 2024 21:51 IST2024-01-13T21:50:48+5:302024-01-13T21:51:20+5:30

ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दाेन तासात आराेपीला जेरबंद केले. 

ARP jailed in just two hours for the murder of a youth due to previous enmity | पुर्ववैमनस्यातून युवकाची हत्या; दाेन तासांत आराेपी जेरबंद

पुर्ववैमनस्यातून युवकाची हत्या; दाेन तासांत आराेपी जेरबंद

अकोला : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील जवाहर नगर परिसरात एका निष्पाप विद्यार्थ्याची हत्या झाली होती. तेरा दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच शनिवारी क्षुल्लक कारणावरून एका ३६ वर्षीय युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. रामदास पेठ पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दाेन तासात आराेपीला जेरबंद केले. 

रामदास पेठ पाेलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपोजवळ मनाेज प्रकाश कामेलू राहणार दुबेवाडी या ३६ वर्षाच्या युवकाची हत्या झाल्याचे समोर आले. हा युवक निर्मनुष्य जागी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या युवकाची हत्या धारदार शस्त्राने डोक्यावर वार केल्यामुळे झाल्याची माहिती आहे. हा युवक त्याच्या दाेन मित्रांसाेबत दारू पित हाेता. यावेळी निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे बाेलल्या जात असले तरी या हत्येला पुर्ववैमनस्याची किनार असल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणी विजय महेंद्र संघे याला अवघ्या दाेन तासात न्यु रिगल टाॅकीज परिसरातून ताब्यात घेतलं. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: ARP jailed in just two hours for the murder of a youth due to previous enmity