स्थापत्य अभियंत्याचे काम सैनिकासारखे - देवेंद्र लाडंगे
By Admin | Updated: April 16, 2015 01:37 IST2015-04-16T01:37:09+5:302015-04-16T01:37:09+5:30
‘स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर’ विषयावर अकोल्यात राष्ट्रीय परिषद

स्थापत्य अभियंत्याचे काम सैनिकासारखे - देवेंद्र लाडंगे
अकोला : स्थापत्य अभियंत्याचे (सिव्हिल इंजिनिअर) काम सैनिकासारखे असून, या अभियंत्यावर देशाची मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी खर्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सी. लांडगे नाशिक यांनी केले. श्री. शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय बाभूळगाव अकोला व इंडियन वॉटर वर्क असोसिएशनच्यावतीने ह्यस्थापत्य अभियांत्रिकी टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापरह्ण या विषयावर बुधवार, १५ एप्रिल रोजी श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी लांडगे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक शिक्षण डॉ.जी.आर. शेकापुरे होते. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले अकोला, अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, आयडब्ल्यूडब्ल्यूएचे अध्यक्ष श्रीकांत कालेले अमरावती, अभियंता एल.के.जैन, डॉ.पी.व्ही.दुर्गे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. लांडगे यांनी तांत्रिक बदल हे लोकाभिमुख व नवीन पिढीसाठी उपयोगी असावे, यासाठी स्थापत्य अभियंत्यांनी काम करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. याच बरोबर अभियंत्यांना काम करताना या अभियंत्यांना कंत्राटदार, सामान्य माणसापासून ते राजकीय पुढार्यांपर्यंत व्यवस्थापन करावे लागत आहे. त्यासाठी या अभियंत्यांना आता अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच व्यवस्थापनाचे (मॅनेजमेंट) शिक्षण देण्याची गरज आहे. या सर्व परिस्थिती अभियंत्याचे कौशल्य कुचकामी ठरत आहे. पण अभियंत्यांवर देश उभारणीची जबाबदारी असल्याने त्यांनी प्रामाणिकपणे देशासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गोखले यांनी पाण्याची गरज, आहे त्या पाण्याचा यथोचित वापर व देखभाल दुरुस्तीवर मत मांडले. शेकापुरे यांनी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी स्थापत्य अभियंत्यावर आहे. तसेच नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठीचे नवे तंत्रज्ञान विकसित करावे, ही जबाबदारी या अभियंत्यांनी प्रामाणिकपणे पार पडण्याचे आवाहन केले. जैन यांनी ह्यपाणी साठवणुकीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावर सादरीकरण केले. या राष्ट्रीय परिषदेत ५४ संशोधन शोध निबंध प्राप्त झाले आहेत. सायंकाळी या एक दिवसीय परिषदेचा समारोप झाला. या परिषदेला जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांंची उपस्थिती होती. संचालन माधुरी देशमुख यांनी केले. तसेच आनंद जवजांळ, अजय मालोकार, प्रा. अभिनंदन गुप्ता आदींची उपस्थिती होती.