सदानंद सिरसाट, अकोला अकोला महापालिका निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी दाखल केलेल्या शिंदेसेनेच्या दोन, तर काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बुधवारी छाननीत बाद झाला. उद्धवसेनेच्या उमेदवाराला कंत्राटदार असणे भोवले, तर इतरांना विविध कारणांसाठी निवडणुकीचे मैदान सोडावे लागले. महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी दाखल झालेल्या ७७७पैकी ५८ अर्ज छाननीत बाद झाले. असून, आता ७१९ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत दाखल अर्जाची बुधवारी छाननी झाली. त्यामध्ये प्रभाग पाच 'ब' जागेवर उमेदवारी दाखल केलेले शिंदेसेनेचे उमेदवार विजय वानखडे यांचा अर्ज जातवैधता प्रस्ताव दाखल केल्याची पावती नसल्याने रद्द झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.
त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या ३, ४, ५ व ६ क्रमांकाच्या असलेल्या ३, ४, ५ व ६ क्रमांकाच्या प्रभागातील एकूण तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. प्रभाग क्रमांक १४ 'अ' या जागेसाठी अर्ज केलेल्या काँग्रेसच्या उमेदवार कोकिळा वानखडे आणि शिंदेसेनेच्या मोनल रमेश दुर्गे या दोन महिला उमेदवारांचे अर्जही बाद झाले.
कंत्राटदार रिंगणातून बाद
प्रभाग क्रमांक ८ 'ब' जागेवर उमेदवारी दाखल केलेले उद्धवसेनेचे निलेश उज्जैनकर यांचा अर्ज कंत्राटदार असल्याने रद्द झाला आहे. झोन क्रमांक तीनचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप अपार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग ८, ९, १० व १७ मध्ये एकूण १४३ उमेदवार रिंगणात आहेत.
विविध कारणांनी बाद झाले अर्ज
झोन पाचचे निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली, तर उमेदवारांनी अतिरिक्त दाखल केलेले २० अर्ज बाद झाले आहेत.
झोन क्रमांक सहामधील प्रभाग क्रमांक १६, १९ व २० मधील एकही अर्ज बाद झाला नाही. या तीनही प्रभागांत ८० उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. झोन क्रमांक एकमधील प्रभाग क्रमांक १, २ व ७ मधून पाच अर्ज बाद झाले आहेत. या प्रभागांत १३१ उमेदवार रिंगणात आहेत.
झोन क्रमांक चारमध्ये सर्वाधिक म्हणजे, आठ 3 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी बाद झाले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संतोष येवलीकर यांनी सांगितले.
Web Summary : Akola Municipal elections see several nominations rejected, including from Shinde Sena, Uddhav Sena and Congress, leaving 719 candidates contesting. Rejection reasons vary from invalid caste certificates to contractor status.
Web Summary : अकोला नगर निगम चुनावों में कई नामांकन रद्द, जिनमें शिंदे सेना, उद्धव सेना और कांग्रेस के शामिल हैं, जिसके बाद 719 उम्मीदवार मैदान में हैं। जाति प्रमाण पत्र से लेकर ठेकेदार होने तक, रद्द होने के कारण अलग-अलग हैं।