अकोला जिल्ह्यात आणखी २२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:01 IST2020-11-03T16:01:38+5:302020-11-03T16:01:48+5:30
२२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४५८ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात आणखी २२ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४५८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये आदर्श कॉलनी व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी चार, लक्ष्मी नगर व ज्योती नगर येथून प्रत्येकी तीन, राऊतवाडी येथील दोन, दहेगाव ता. बाळापूर, जठारपेठ, मराठा नगर, वृदांवन नगर, लहरिया नगर व जीएमसी बॉय हॉस्टेल येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
२१५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.