महागाई वाढविणारे बजेट - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 17:51 IST2022-02-01T17:50:23+5:302022-02-01T17:51:39+5:30

Prakash Ambedkar on Union Budget : केवळ महागाई वाढविणारे हे बजेट आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Ambedkar's budget that raises inflation | महागाई वाढविणारे बजेट - प्रकाश आंबेडकर

महागाई वाढविणारे बजेट - प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प सामान्यांची घाेर निराशा करणारा असून, यामुळे महागाई वाढणार असल्याची टीका राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

यासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की,  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अनेक संकटांमुळे खचून गेलेल्या सर्वसामान्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात खुप अपेक्षा हाेती; मात्र नेहमीप्रमाणे जनतेला वंचित ठेवण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या हिताचे काहीच दिसत नाही. आधीच महागाईत भरडल्या जात असलेल्या सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळणे गरजेचे हाेते. मात्र त्यांची यावेळीही उपेक्षा झाली आहे. केवळ महागाई वाढविणारे हे बजेट आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Web Title: Ambedkar's budget that raises inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.