शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची तांब्याची तार विकणारे तिघे गजाआड

By admin | Updated: June 20, 2015 02:44 IST

अमरावती जिल्हय़ातून केली होती तार लंपास.

अकोला: अमरावती जिल्हय़ातील वलगाव येथून तांब्याची तार चोरून ती अकोल्यातील टिळक रोडवर विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा जणांना कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. टिळक रोडवरील वखारिया बिल्डिंगजवळ तांब्याची तार विकण्यासाठी तिघें जण आल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. एमएच 0४ बीक्यू ७४६९ क्रमांकाच्या इंडिका कारमध्ये तांब्याची तार घेऊन आलेल्या शेख अनिस शेख अफजल (३२), इकरामोद्दीन तमीजोद्दीन (४0) आणि शेख समीर शेख अकील (२४ तिघेही रा. बाळापूर) यांना अटक केली. गडाम राजीक हा फरार झाला. आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यांची चौकशी केली असता, शेख आबीद, शेख अलीम (रा. बाळापूर), अण्णा नामक इसम (रा. बोरगाव मंजू), साजीद, पप्पू व बबलू नामक इसमांनी अमरावती जिल्हय़ातील वलगाव येथून १ क्विंटल ६७ किलो तांब्याची तार चोरली आणि एका शेतात दडवून ठेवल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. परंतु तांब्याची तार चोरणार्‍या आरोपींना वलगाव पोलिसांनी अटक केली. यातील आरोपी अण्णा हा चोरी करताना जळाल्याने तो सर्वोपचार रुग्णालयात भरती आहे. त्याच्याकडून गुडाम राजीक याला तांब्याच्या तारेची माहिती मिळाली आणि त्याने या तारेची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार गुडाम राजीकने आम्हा तिघांना ही माहिती दिली. १७ जून रोजी आम्ही चौघांनी वलगाव येथून तांब्याची तार इंडिका कारमध्ये टाकून अकोल्यात आणल्याची माहिती पोलिसांना दिली.