शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:42 PM

१७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे.

अकोला : कोलकाता येथील एन.आर.एस. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉ. परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार, १७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे.डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ वारंवार आंदोलन करून केंद्रीय कायद्याची मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे; मात्र अद्याप यावर कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. अशातच कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी देशभरात डॉक्टरांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. सोबत डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंध कायद्याची मागणी केली. केंद्र शासनाने आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचारावर अंकुश लावण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, ही मागणी जोर धरत आहे. यासाठी सोमवार, १७ जून रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन आय.एम.ए. अकोलाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत मोरे, सचिव डॉ. पराग डोईफोडे, डॉ. अजयसिंग चव्हाण, डॉ. रणजीत देशमुख, डॉ. सत्येन मंत्री, डॉ. आशिष डेहेनकर, डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. सुनीता लढ्ढा, डॉ. साधना लोटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.अत्यावश्यक सेवा सुरूडॉक्टरांचे आंदोलन रुग्णांच्या जीवावर बेतू नये, यानुषंगाने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचे आय.एम.ए.ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे किरकोळ रुग्णसेवा बंद असली, तरी अत्यावश्यक रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टरagitationआंदोलन