शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 7:58 PM

Akot Vidhan Sabha Election Results 2019: भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला.

- विजय शिंदे

अकोट: अकोट मतदार संघ हा निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान १२ मतदान यंत्रावर विविध कारणाने आक्षेप झाले होते. त्या मतदान यंत्रामधील मतमोजणी करीता भाजपा उमेदवार प्रकाश भारसाकळे व वंचित आघडीचे अ‍ॅड संतोष रहाटे यांच्यात झुंज दिसुन आली. या मतदान यंत्रामधील मतमोजणी होई पर्यंत या दोन्ही उमेदवार व त्यांचे कार्यकतार्चा जीव टांगणीला लागला होतो. दरम्यान रात्री सर्व आक्षेप दुर करीत त्या बारामशीन मधील मतमोजणी घेण्यात आली. मतदान केंद्र १९७ वरील मशीन बिघाड असल्याने व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी झालेल्या चिठ्या काढुन मग मोजणी करून घेण्यात आली.अखेर भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला.अकोट मतदार मतदारसंघात मतमोजणी सुरू असतांना काही मतदानयंत्र सुरू होत नव्हती. तर मतदार यंत्राला वेगवेगळे सिल लागले होते.त्यामुळे मतदान केंद्र १२७,१४१,१९७,१९१, २४७,१७८,३१८ २५२ वरील एकुण १२ मतदान यंत्राची मत मोजणी थांबवली होती, तर मतदान केंद्र १९७वरील मशीन वर आक्षेप नोंदवला होता.त्यामुळे या मतदान यंत्राची मतमोजणी बाजुला ठेवण्यात आली होती. पंरतु दुसरीकडे भारसाकळे व रहाटे यांच्यात २४ व्या फेरी अखेर ७ हजार २९६ मतांचा फरक होता. तर दुसरीकडे त्या बारा मशीन मधील मतमोजणी बाकी होती. मताची आघाडी असल्याने मतमोजणी केंद्राकडे येण्यास निघालेले भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे मध्येच थांबले तर ही माहीती वंचीत आघाडीचे अ‍ॅड संतोष रहाटे हे मतमोजणी केंद्रात पोहचले होते.त्यामुळे या मतमोजणी कडे उमेदवार, कार्यकर्ते व नागरीकाचे लक्ष लागले होते. शेवटची २४ वी फेरी जाहीर झाल्यानंतर आक्षेप व बंद पडलेल्या मशीन यंत्र प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आक्षेपकर्ता यांचे समाधान केले. तर आक्षेपवर असलेला निर्णय लेखी स्वरूपात अँड. रहाटे यांनी घेतला. तर बंद पडलेली मतदान यंत्र भारत निवडणूक आयोगाचे नियमानुसार मतमोजणी घेतली. तर मतदान केंद्र १९७ वरील मशीन बिघाड असल्याने व्हीव्ही पँड माध्यमातून मतमोजणीची प्रक्रीया राबविण्यात आली. अखेर या १२ मशीन यंत्राची मतमोजणी झाल्यानंतरही भाजपाचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हे आघाडी चे मते घेत विजयी ठरले.

टॅग्स :akot-acअकोटPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा