अकोल्याचे तापमान ४१.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:53+5:302021-05-14T04:18:53+5:30

अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या तापमानामुळे ...

Akola's temperature is 41.8 degrees Celsius | अकोल्याचे तापमान ४१.८ अंश सेल्सिअस

अकोल्याचे तापमान ४१.८ अंश सेल्सिअस

Next

अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या तापमानामुळे दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.---------------------------------------------------------

‘छत्रपती संभाजी महाराज जयंती घरीच साजरी करा!’

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, छावा संघटनेतर्फे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक व उत्सव रद्द करण्यात आला आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या परिवारासह घरीच जयंती साजरी करावी, असे आवाहन ‘छावा’चे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे यांनी केले.

-------------------------------------------

रोजगार सेवकांना मानधन वाढविण्याची मागणी

अकोला : लोकांच्या हाताला काम द्यावे, म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. मानधन वाढविण्याची मागणी होत आहे.

---------------------------------------------

एसटी बसची चाके थांबलेलीच!

अकोला : कोरोना व संचारबंदीमुळे एसटी महामंडळाच्या बसेस बंद आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाला दररोज लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

-------------------------------------------------

पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी

अकोला : ग्रामीण भागात शेतीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.

-------------------------------------------------

शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे!

अकोला : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट वीज दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीजबिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत. याकरिता महावितरणकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे.

---------------------------------------------------

अकोल्यात शून्य टँकर

अकोला : मान्सूनला २० दिवस बाकी आहे; मात्र यावर्षी जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाईची स्थिती दिसून येत नाही. प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने सद्यस्थितीत एकही टँकर सुरू नाही.

Web Title: Akola's temperature is 41.8 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.