शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

अकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न पोहोचला राज्यभरात!

By atul.jaiswal | Published: September 05, 2018 3:35 PM

एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत.

ठळक मुद्देज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत १ लाख २० हजार झाडांचे रोपण करण्यात आल्याचा दावा ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.

- अतुल जयस्वालअकोला : तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता तथा भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात २०१७ मध्ये सुरू केलेला ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २२ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.‘एक जन्म-एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात जून २०१८ पासून करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी १४ मे रोजी दिल्या होत्या. तेव्हापासून राज्यभरात ही मोहीम फोफावली आहे. या मोहिमेंतर्गत ज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. या वृक्षाचे जतन करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका त्या कुटुंबास प्रोत्साहित करीत असून, या प्रयोगामुळे वृक्ष लागवडीस मदत होत आहे. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात गट प्रवर्तक व आरोग्य विभागातील कर्मचारी प्रयत्नरत आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत १ लाख २० हजार झाडांचे रोपण करण्यात आल्याचा दावा ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.समन्वयासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपया मोहिमेच्या समन्वयासाठी नाथन यांनी ‘एक जन्म-एक वृक्ष’ नावाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपवर माहितीचे आदान-प्रदान केले जाते. राज्यभरातील समन्वयक या ग्रुपवर वृक्षारोपणाचे छायाचित्र व आकडेवारीची माहिती टाकतात.आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाचीया मोहिमेत गावपातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे. आशा स्वयंसेविका ज्या घरात बालकाचा जन्म झाला आहे, अशा घरांना भेटी देऊन त्यांना वृक्षारोपणासाठी प्रवृत्त करतात.राज्यभरात लागू झाल्यापासून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी स्वत: अकोल्यासह १२ जिल्ह्यांमध्ये जाऊन मोहिमेबाबत मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार झाडे लावण्यात आल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.- ए. एस. नाथन, संस्थापक, भारत वृक्ष क्रांती मोहीम, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाGreen Planetग्रीन प्लॅनेट