शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:29 IST

या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आई-वडील शेतमजुरी करणारे, प्रसंगी गावावरून शाळेत पायी येणाऱ्या, मराठी माध्यमात शिकणाºया विद्यार्थिनींनी कमाल केली आहे. नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना तोंडात बोटे घालायला लावत, मनूताई कन्या शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी तहान-भूक विसरून सतत तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर दैनंदिन समस्यांचे निराकरण करणारा ‘रोबोट’ बनविला आहे. या रोबोटची फर्स्ट लिगो लीगसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे.मुंबई लिगो एज्युकेशन ही आॅर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीगचे आयोजन करीत असते. या लीगमध्ये यंदा शहरातील समस्या आणि त्याचे निराकरण हा विषय घेतला असून, ही स्पर्धा १८ व १९ जानेवारी रोजी मुंबईला होणार आहे. या लीगमध्ये मनूताई कन्या शाळेतील १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यासाठी लिगो एज्युकेशन आॅर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले. या विद्यार्थिनींना किट्सच्या संचालक व रोबोटिक्सच्या तज्ज्ञ काजल राजवैद्य, शिक्षक विजय भट्टड यांनी तसेच त्यांच्या सामाजिक बांधीलकी विभागानेसुद्धा मार्गदर्शन व मदत केली. या विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने छोट्या पाटर््सचा वापर करून रोबोट तयार केला असून, त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग स्वत: तयार केले आहे. एकही दिवस सुटी न घेता, या विद्यार्थिनींनी रोबोटची निर्मिती केली. रोबोट बनविणाºया या विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. शहरालगतच्या छोट्या गावांमधून येणाºया विद्यार्थिनींकडे आॅटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बºयाचदा या विद्यार्थिनी शाळेत पायी येतात. रोबोटच्या उपयोगिता सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनत घेतली असून, इंग्रजीमध्ये त्यांनी छान मांडणी केली आहे. या विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांचेही मार्गदर्शन लाभले.

काय काम करतो ‘रोबोट’!विद्यार्थिनींनी बनविलेला रोबोट ट्रॅफिक जाम, नैसर्गिक आपत्ती, संकटात सापडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो. यासोबतच झाडांवर ट्री हाउस तयार करण्याचे काम करतो. क्रेन चालविण्यासाठी, बांधकाम साहित्य, मटेरियल्स पोहोचविण्यासाठीसुद्धा रोबोटची मदत होते. याशिवाय हा रोबोट उंचीवरसुद्धा चढू शकतो.या विद्यार्थिनींनी बनविला ‘रोबोट’!शहरातील ११0 वर्षे जुन्या मनूताई कन्या शाळेत शिकणाºया रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे, प्रणाली इंगळे यांनी सांघिक भावनेतून हा रोबोट बनविला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRobotरोबोटStudentविद्यार्थी