शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

नीट परीक्षेत अकोल्याच्या काटेचा ‘विक्रम’!

By admin | Updated: June 24, 2017 05:57 IST

ओबीसीमधून राज्यात पहिला, अकोल्यातील विद्यार्थ्यांची नीट परीक्षेत बाजी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. अकोल्यातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश काटे यांचा मुलगा विक्रम काटे याने नीट परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गातून राज्यातून पहिला, तर विद्यार्थ्यांमधून राज्यात दुसरा क्रमांक आणि भारतातून सातवा क्रमांक पटकावला. विक्रमने ७२0 पैकी ६७३ गुण पटकावून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीट (एनईईटी) ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते. देशात एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी (एआयआयएमएस व जेआयपीएमईआर) वगळून एकच नीट परीक्षा देशपातळीवर घेण्यात आली. यावर्षी ही परीक्षा दहा स्थानिक भाषांमध्ये व २६ वेगवेगळय़ा सेटमध्ये घेण्यात आली. परीक्षेसाठी देशभरातील १0३ शहरांमध्ये १0४६ केंद्रांवर ११ लाख ३८ हजार ८९0 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा नीट परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वापरून अभ्यास केल्यामुळे पहिल्यांदा अकोल्यातून जिपमरसारख्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. विक्रम काटे याने यापूर्वीच जिपमर या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत दोन लाख विद्यार्थ्यांमधून ओबीसी प्रवर्गात २0 वा क्रमांक पटकावला. नीटमध्ये राष्ट्रीय २0 व्या क्रमांकावरून त्याने एकदम सातव्या क्रमांकावर झेप घेतली, हे कौतुकास्पद आहे. एवढेच नाही, तर त्याने जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये भारतातून प्रथम ३0 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. विक्रमसोबतच त्याचे सहकारी आकाश मंत्री याने ६५५ गुण (एआयआर २५0), गौरी भंसाली हिने ६३६ (एआयआर ६६९), यशपाल पाकळ याने ६३५ (एआयआर १३१), जितेश भिरड याने ६0५ (एआयआर ६१३), गौरी पांडे हिने ६0७ (एआयआर २२१८), सौरभ खिडकीकर याने ६0५, साक्षी सोमाणी हिने ५९७, धनंजय सहस्रबुद्धे याने ५८६ गुण, राधिका मल हिने ५७३ गुण, देवनिधी पाटील हिने ५३९ गुण, ओम गवई याने ५२६ (एआयआर २३९), ऋग्वेद ढोरे याने ५२१ गुण, राधा टोम्पे हिने ५१३ गुण, गार्गी देशमुख हिने ५0१, पलक गोठी हिने ४९0, प्रणव खडके याने ४७५, संकेत निरबान याने ४५७ गुण प्राप्त केले. पालकमंत्र्यांचा मुलगा शर्व पाटील पुन्हा चमकलाजिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील राजकारणात चमकदार कामगिरी करीत असताना, त्यांचा मुलगा शर्व पाटील हा कसा मागे राहील, वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत शर्वनेसुद्धा नाव उज्ज्वल करीत नीट परीक्षेत ६५७ गुण प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले. बारावीच्या परीक्षेतसुद्धा ९५.८५ टक्के गुण मिळविले. दहावीच्या परीक्षेतसुद्धा शर्वने राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला होता.