शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 7:43 PM

पातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे  (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे. 

ठळक मुद्देपातूर-बाभुळगाव मार्गावर घडली घटनामृत युवक - प्रशांत विश्राम इंगळे हा अकोल्यातील रमेश नगर, डाबकी रोड येथील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे  (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे. प्रशांत इंगळे  हे वाडेगाव येथील सासरवाडीत चार ते पाच दिवसापासून मुक्कामी होते. त्यांचे मामा पातुरात राहत असल्यामुळे त्यांच्या भेटीसाठी वाडेगावकडून पातुरकडे ते  स्कुटी क्रमांक एमएच ३0 एक्यू ५३९२ ने येत होते. दरम्यान, दिग्रस फाट्याजवळ डाव्या बाजुला लघुशंका करून रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जबरदस्त धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला व ते जागीच ठार झाला. मृतक हे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे नगर रचना विभागात अनुरेखक पदावर कार्यरत होते. त्यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. २७ डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवससुद्धा होता. त्यांना आईवडील, एक भाऊ व चार बहिणी आहेत. त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले असून वृत लिहेपर्यंत अज्ञात वाहना चालकाविरुद्ध कलम ३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल करणे सुरू होते. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघातAkola Old cityअकोला जुने शहरDeathमृत्यू