ढाब्यावर दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 11:53 AM2018-12-06T11:53:47+5:302018-12-06T12:28:07+5:30

पारसनजीक असलेल्या शिवनेरी ढाब्यावर अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून एका ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी (6 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली.

Akola : truck driver killed by thieves | ढाब्यावर दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या

ढाब्यावर दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या

Next
ठळक मुद्देदरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून ट्रक चालकाची केली हत्यापोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अकोला : पारसनजीक असलेल्या शिवनेरी ढाब्यावर अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून एका ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी (6 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली. खुलेआम दरोडा अन् हत्या करण्यात आल्याने अकोला पोलिसांचे गुन्हेगारीवर वचक संपल्याचे सिद्ध होत आहे. पारस फाट्यावरील शिवनेरी ढाब्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एचआर ६३ बी ६६५७ क्रमांकाच्या ट्रकचालक विजय रॉय जगन्नाथ रॉय यांची हत्या केली.

चालकाच्या हत्येनंतर या टोळीनं जवळच्याच शिवनेरी धाब्यावर हैदोस घालीत लुटीचा प्रयत्न केला. यानंतर या टोळीनं डब्लूबी ०३ डी ०५१२ क्रमकांच्या ट्रकला लुटण्याचाही प्रयत्न केला. चार ते पाच लोकांच्या या टोळीचा थरार राष्ट्रीय महामार्गावर तासभर सुरू होता. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळापूर पोलीस आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Akola : truck driver killed by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.