अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची टॅँकरला धडक; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:34 IST2017-12-13T02:33:26+5:302017-12-13T02:34:15+5:30
बाभुळगाव जहॉ : भरधाव ट्रकने समोरील टॅँकरला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी बाभूळगाव जहागीर गावाजवळ घडली. दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडले होते.

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची टॅँकरला धडक; एक गंभीर
ठळक मुद्दे२ डिसेंबर रोजी दुपारी बाभूळगाव जहागीर गावाजवळ घडली दुर्घटनादोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडले
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभुळगाव जहॉ : भरधाव ट्रकने समोरील टॅँकरला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी बाभूळगाव जहागीर गावाजवळ घडली. दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडले होते.
ट्रक क्र. एमएच १९ ए २६१५ हा अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे जात होता. दरम्यान, बाभूळगाव गावाजवळ या ट्रकने समोरच्या टँकर क्र. एमएच २९ पी २00 ला जबर धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात कोसळले. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमीला उपचारार्थ हलविले.