अकोला: सौंदळा येथे युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 06:13 PM2018-08-05T18:13:09+5:302018-08-05T18:14:52+5:30

सौंदळा  (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

Akola: Suicide by a young farmer by poisoning him at Saundala | अकोला: सौंदळा येथे युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

अकोला: सौंदळा येथे युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देओमप्रकाश भटकर याने मे २०१८ मध्ये एक एकर शेत नवीन विकत घेतले. पेरणीसाठी आणि आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी बँकेमार्फत कर्जही उचलले. कर्ज फिटणार नाही, या विवंचनेत उरलेली फवारणीची औषण सायंकाळच्या सुमारास प्राशन केले.

सौंदळा  (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून सौंदळा येथील युवा शेतकऱ्याने ४ आॅगस्ट रोजी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ओमप्रकाश रामभाऊ भटकर (४२) असे मृतक शेतकऱ्याचे आहे.
ओमप्रकाश भटकर याने मे २०१८ मध्ये एक एकर शेत विकत घेतले. हे शेत पेरणीसाठी आणि आर्थिक व्यवहार चालविण्यासाठी बँकेमार्फत कर्जही उचलले. शेत पेरले तेव्हापासून निसर्गाची अवकृपा झाली. ४ आॅगस्टच्या सकाळी शेतात फवारणी केली. एक एकराच्या पिकात आर्थिक व्यवहार होणार नाहीत, कर्ज फिटणार नाही, या विवंचनेत उरलेली फवारणीची औषण सायंकाळच्या सुमारास प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी ओमप्रकाशला तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओमप्रकाश हा जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होता. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Akola: Suicide by a young farmer by poisoning him at Saundala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.