अकोला : कुशल बोरकरची राष्ट्रीय ट्रेकिंग शिबिराकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:14 IST2017-12-18T23:12:23+5:302017-12-18T23:14:09+5:30

अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात  येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्‍या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. 

Akola: Selection for Skilled Borkar National Trekking Camp | अकोला : कुशल बोरकरची राष्ट्रीय ट्रेकिंग शिबिराकरिता निवड

अकोला : कुशल बोरकरची राष्ट्रीय ट्रेकिंग शिबिराकरिता निवड

ठळक मुद्देकुशल रमेश बोरकर होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी याच महिन्यात गुजरातमध्ये होणार एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात  येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्‍या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. 
या आधी कुशलने कोल्हापूर येथे झालेल्या बीएलसी कॅम्प, आरडीसी कॅम्प अमरावती,  एटिसी कॅम्प अकोट, सीएटिसी कॅम्प अमरावतीला पूर्ण केला.  प्राचार्य सिस्टर नीता  फर्नांडिस, चीफ ऑफीसर पी.एस. राऊत, एएनओ (आर्मी विंग) ११ महाराष्ट्र बटालियन  एनसीसी अकोला यांनी कुशलचे कौतुक केले. याप्रसंगी कुशलचे पालक मेघा बोरकर व  रमेश बोरकर उपस्थित होते. एनसीसी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सी.ओ. कर्नल  एरावर असन, सब-मेजर रमेश भुसारी, बीएचएम सुदीप थापा, अनिल मिहर, नागापुरे,  चव्हाण, कैलास सराफ, राठोड, मोकळकर, गणेश बोरकर यांनी कुशलला शिबिराच्या  यशस्वितेकरिता शुभेच्छा दिल्या.
  

Web Title: Akola: Selection for Skilled Borkar National Trekking Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.