शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अकोला : डाबकी रोडवरील औषधी दुकानात युवकांनी घातला ‘राडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:32 AM

अकोला : डाबकी रोडवरील एका टोळक्याने मंगळवारी दुपारी नंदाने मंगल कार्यालयानजीक असलेल्या एका औषधे दुकानात भरदिवसा प्रचंड राडा केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देऔषधी दुकानात घातला हैदोसम्हणे पोलीसही आमचे गुलाम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोडवरील एका टोळक्याने मंगळवारी दुपारी नंदाने मंगल कार्यालयानजीक असलेल्या एका औषधे दुकानात भरदिवसा प्रचंड राडा केल्याची घटना घडली. या टोळक्याने औषधे दुकानातील युवकास बेदम मारहाण केली असून, युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. युवकाला मारहाण करताना या सात ते आठ जणांच्या टोळक्याने पोलीसही आमचे काही बिघडवत नसून, आमचे गुलाम असल्याची भाषा वापरल्याने या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत.डाबकी रोडवरील रहिवासी अक्षय टेकाडे यांचे ए. टी. मेडिकोज नावाचे औषधे प्रतिष्ठान आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये शुभम कानकिरड व त्याचे सात ते आठ साथीदार घुसले. त्यांनी औषधांची फेकाफेक करीत अक्षय यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्षय टेकाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. टेकाडे यांना बेदम मारहाण केल्याचे डाबकी रोड पोलिसांना माहिती पडताच त्यांनी या युवकास सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. अक्षय टेकाडेवर उपचार सुरू असून, तक्रारीनंतर रात्री उशिरा शुभम कानकिरड व त्याच्या साथीदारांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२५, ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार सुनील सोळंके यांनी सांगितले. 

कानकिरडची दादागिरी वाढली!शुभम कानकिरड याच्यावर यापूर्वीही प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कानकिरड हा काही युवकांना सोबत घेऊन या परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार या परिसरातील नागरिकांची असून, त्यांनी कानकिरडवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शुभम कानकिरडची दादागिरी प्रचंड वाढली असून, ही दादागिरी या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

शिवसेना पदाधिकार्‍याचे पाठबळडाबकी रोडवर एका टोळक्याची प्रचंड दादागिरी वाढली असून, शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याचे पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या या पदाधिकार्‍यामुळेच हे टोळके परिसरात धुडगूस घालीत असून, पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेनेचा हा पदाधिकारी करीत असल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकरणात स्वत: पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहरCrimeगुन्हा