शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलिसांवर ट्रक घालण्याचा गुरे तस्करांचा प्रयत्न! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:18 IST

अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने पोलिसांवर ट्रक आणण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला. अकोला पोलिसांनी या ट्रकचा चोहोट्टा बाजारपर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

ठळक मुद्देचोहोट्टा बाजारपर्यंत पाठलाग : चालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने पोलिसांवर ट्रक आणण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला. अकोला पोलिसांनी या ट्रकचा चोहोट्टा बाजारपर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना अमरावती येथून एक गुरांना डांबून कत्तलीसाठी अकोल्यात ट्रक येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने ट्रकवर शिवणी येथून पाळत ठेवली, तसेच अशोक वाटिका चौक, नेहरू पार्क चौक व टॉवर चौकात पथकाचे कर्मचारी ट्रकवर पाळत ठेवून होते, ट्रक शिवणी येथून अशोक वाटिकेकडे आला, त्यानंतर थेट तेलीपुरा चौकाकडे ट्रक जात असताना विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने सदर ट्रक पोलीस दिसताच सुसाट पळविण्याचा प्रयत्न केला, यावेळी अळसपुरे यांनी ट्रकच्या काचेवर काठी मारल्याने ट्रकच्या काचा फुटल्या, त्यानंतर ट्रकचालकाने ट्रक अकोट फैल परिसरातून चोहोट्टा बाजाराकडे पळविला. विशेष पथकाचे कर्मचारी दुचाकीवर होते, त्यांनी ट्रकचा चोहोट्टा परिसरापर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रक भरधाव निघून गेला. या प्रकरणाची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, याद्वारे पुढील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली; मात्र दहीहांडा व अकोट पोलिसांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याची माहिती आहे.

नियंत्रण कक्षाला माहितीगुरांना कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाने विशेष पथकाच्या पोलिसांवर ट्रक नेण्याचा प्रयत्न करून तो पळून गेल्याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. या माहितीच्या आधारे नियंत्रण कक्षात नोंद घेऊन ट्रकचा शोध सुरू करण्यात आला; मात्र तोपर्यंत ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला होता.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाPoliceपोलिस