शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलीस अधीक्षकांचा ठाणेदारांना मानसिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:58 IST

खाकीतील अनागोंदी चव्हाट्यावर : विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

चेतन घोगरे

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांच्यावर मानसिक त्रासाला कंटाळून सिक रजेवर जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार नोंदविली आहे.

तक्रारीनुसार, तक्रारदार सुरेश हरिभाऊ नाईकनवरे हे अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपली  सेवा सहा वर्षे शिल्लक आहे. पोलीस दलात २१ वर्षांची सेवा दिली. मात्र, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर हे मला जिल्ह्यात हजर झाल्यापासून लहान-लहान कारणांवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानित करत आहे. एसपींनी मला १० एप्रिल रोजी दुपारी कक्षात बोलावून ‘इडियट यू बास्टर्ड’ म्हणून शिवीगाळ केली व तुम्ही आयुक्तांना माझ्या परवानगीशिवाय पत्र का दिले, असे म्हणून माझा अपमान केला. त्यामुळे माझा रक्तदाब वाढला असून माझी शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे. याच कारणावरून माझा आत्महत्येचा विचार चालू आहे. त्यामुळे मी हतबल झालो आहे. मी सध्या अकोला येथे राहत असून, माझी पत्नी व परिवार बीड जिल्ह्यात राहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे सध्या आपणास भेटणे शक्य नसल्याने मी लेखी पत्र तसेच पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी केलेल्या शिवीगाळीच्या तीन आॅडिओ क्लिप आपल्या व्हाट्सअ‍ॅपवर पाठविले आहेत, असे त्यांनी स्पेशल आयजींना केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत त्यांनी अकोला सिटी कोतवाली येथे नोंद घेतली आहे. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

नाईकनवरेंची बुलडाण्यात बदलीजिल्हा पोलीस अधीक्षकांविरूद्ध तक्रार करणाºया आणि अकोला सिटी कोतवाली येथे ठाणेदार असलेल्या सुरेश नाईकनवरे यांची बुलडाणा येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी १२ एप्रिल रोजी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या