अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार

By राजेश शेगोकार | Updated: June 11, 2023 12:06 IST2023-06-11T12:06:14+5:302023-06-11T12:06:26+5:30

मुर्तिजापूर नजीकची घटना 

Akola: One killed in two vehicle accident on National Highway | अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार

अकोला: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबडी नजीक दोन वाहनांच्या अपघातात एक जण चालक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. चालक अजयसिंग अमरसिंग सिग असे मृतकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीकडून अकोल्याकडे मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 28 ए बी 8917 हा जात होता. तर पिकप गाडी ही अमरावती कडे जात होती. या दोन वाहनाची खरबडी नजीक समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकप गाडीचा चालक अजयसिंग अमरसिंग सिग (वय 45 शिवरानी उत्तर प्रदेश) हा गंभीर जखमी झाला.

त्याचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर रडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला.

 

Web Title: Akola: One killed in two vehicle accident on National Highway

टॅग्स :Accidentअपघात