अकोला : भरधाव चारचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:53 IST2018-02-11T21:46:19+5:302018-02-11T21:53:02+5:30
अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

अकोला : भरधाव चारचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरून चारचाकी वाहन क्र. एमएच - ३0 - एबी - ३९९६ भरधाव व निष्काळजीपणे चालक रजनिकांत अजय निलमकार (रा. कस्तुरबा गांधी बाग, भंडारा) चालवित होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याला लागून असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. त्याच्या बाजूने बसलेल्या वैशाली सुभाष वानखडे (३0, रा. कापशी रोड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सहकारी रेखा गवईया जखमी झाल्या आहेत. चालक रजनिकांत निलमकार याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी दिली.