अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 19:25 IST2024-10-07T19:23:01+5:302024-10-07T19:25:13+5:30

Akola News: अकोल्यामधील हरिहरपेठ येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याने परिस्थिती चिघळली.

Akola News: Argument between two groups over minor issues in Akola, stone pelting at Harihar Peth, pre-tension situation | अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती

अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती

अकोल्यामधील हरिहरपेठ येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या वादानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाल्याने परिस्थिती चिघळली. दरम्यान, तणाव निवळून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार  जुने शहरातील हरिहर पेठ येथे आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ऑटोचा धक्का लागल्याचं निमित्त होऊन दोन समुदायात वाद झाला. त्यानंतर एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या व वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

Web Title: Akola News: Argument between two groups over minor issues in Akola, stone pelting at Harihar Peth, pre-tension situation

टॅग्स :Akolaअकोला