शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

अकोला मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 2:30 PM

एका हॉटेलचे अतिक्रमण न काढण्यासाठी घनबहादूर याने सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अधिकारी नरेंद्र पुंडलिकराव घनबहादूर याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अतिक्रमण विभागाच्याच कार्यालयातून अटक केली. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलचे अतिक्रमण न काढण्यासाठी घनबहादूर याने सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता; मात्र ही कारवाई टाळण्यासाठी अतिक्रमण विभागाचा प्रमुख नरेंद्र पुंडलिकराव घनबहादूर (५४) याने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ आॅक्टोबर रोजी पडताळणी केली असता नरेंद्र घनबहादूर याने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले; मात्र तडजोडीनंतर ही रक्कम १५ हजार देण्याचे ठरले. त्यानुसार १५ हजार रुपयांमधील पाच हजार रुपये पहिला हप्ता गुरुवारी अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात स्वीकारण्याचे ठरले. तक्रारकर्ता पाच हजार रुपये घेऊन अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर नरेंद्र घनबहादूर याने पाच हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घनबहादूर याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून पाच हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लाचखोर घनबहादूर यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका