शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य दिलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 10:51 IST

Akola Municipal Corporation : महापालिकेकडून सुरक्षा किट देण्यावरून हात झटकण्यात आल्याचे दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात साफसफाईची कामे करणाºया मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सफाई कर्मचारी संघटनेने महापालिकेकडे सुरक्षा किट उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. मागील सहा महिन्यांपासून अद्यापही सफाई कर्मचाºयांना सुरक्षा किट देण्यात आली नसून याव्यतिरिक्त मास्क, हातमोजे तसेच सॅनिटायझर आदी साहित्याचा अभाव असल्यामुळे सफाई कर्मचाºयांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. मनपाच्या सफाई कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, जलप्रदाय विभाग व मोटरवाहन विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सफाई कर्मचाºयांना प्रशासनाच्यावतीने कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नसल्याचा आरोप करीत मनपा सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यापृष्ठभूमीवर महापौर अर्चना मसने यांच्या दालनात सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा पार पडली असता त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौर मसने, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले होते. त्यावर सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. यादरम्यान, सदर साहित्य व सुरक्षा किटही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची असल्याचे सांगत महापालिकेकडून सुरक्षा किट देण्यावरून हात झटकण्यात आल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती आजही कायम असल्याचे चित्र दिसून आहे.

प्रशासनाकडून कर्मचाºयांची बोळवण!मनपाच्या वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच अग्निशमन विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एकूणच अत्यावश्यक सेवेत काम करणाºया अधिकारी-कर्मचाºयांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग तसेच स्वच्छता विभागाची असतानासुद्धा या विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका