शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

अकोला बाजार समितीचे व्यवहार सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 4:37 PM

शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

अकोला:अकोला बाजार समितीत शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले परंतु इतर दिवसापेक्षा सोमवारी शेतमाल कमी आला.सर्वात जास्त २००९ क्विंटल हरभरा तर ३४०१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.अकोल्यात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन शहरात १ ते ६ जून पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु त्याला मान्यता न मिळाल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या आहावनाला शहरातील प्रतिष्ठानांनी आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला दिला आहे .असे असले तरी शेतमाल खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडले .शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत गरज असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत.परंतु सोमवारपासून अकोला शहरात जनता कर्फ्यू असल्याचे सांगण्यात येत असल्याने दररोज पेक्षा सोमवारी थोडासा शेतमाल कमी विक्रीस आला .२००९ क्विंटल हरभरा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला .हरभºयाला सरासरी प्रतिक्विंटल ३,८०० रुपये दर मिळाले. सोयाबीन ७७९ क्विंटल आवक झाली सरासरी प्रतिक्विंटल ३,५०० रुपये दर होते.४९३ क्विंटल तूर विक्रीस आली होती. तुरीला सरासरी ५,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.३७९ क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. सरासरी दर प्रतिक्विंटल १,७०० रुपये होते.१५४ क्विंटल शरबती गहू विक्रीस आला होता .या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २,५५० रुपये दर मिळाले.बाजार समितीच्या बोरगाव मंजू केंद्रावर ३,४०१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ५,३५० रुपये दर मिळाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती