अकोला : विनयभंगाचा आरोप असलेल्या युवकाने केली आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:43 IST2017-12-27T22:36:50+5:302017-12-27T22:43:01+5:30
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

अकोला : विनयभंगाचा आरोप असलेल्या युवकाने केली आत्महत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या युवकाने आत्महत्या केल्यामुळे युवतीच्या तक्रारीवर संशय निर्माण होत असून, सदर युवकाला फसविण्यासाठीच ही तक्रार केली असून, या युवकाच्या मृत्यूस युवतीच जबाबदार असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी युवती घरातून बाहेर जात असताना आशिष अडवाणी याने तिचा विनयभंग केला, तर दुसरा अमर पंजाबी याने तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या युवतीने केला होता. युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनीही या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र, दुसर्याच दिवशी या प्रकरणात आरोप असलेला अमर पंजाबी या युवकाने गायगावनजीक रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सिंधी कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. युवतीने केलेला आरोप सहन न झाल्यामुळे युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.