शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; केंद्रीय वन विभागाकडून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:30 IST

अकोला : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉड गेज रूपांतरास वन सवंर्धन कायद्याची परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रूपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत  परिवहन भवन येथे रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. ...

ठळक मुद्देअकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली.अकोला- खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला .मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती.

अकोला : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉड गेज रूपांतरास वन सवंर्धन कायद्याची परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रूपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत  परिवहन भवन येथे रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या अकोला- खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला .

 अकोट ते आमला खुर्द ब्रॉडगेजचे काम लवकरचअकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरास सुरुवात झाली असून, सध्या अकोला-अकोट मार्गाच्या गेज रूपांतरणाचे काम सुरू आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील अकोट ते आमला खुर्द हा भाग अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते. त्यालासुद्धा गती मिळणार आहे. दीड ते दोन वर्षांत गेज रूपांतरणाचे काम होणार पूर्णअकोला ते खंडवा गेज रूपांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजच्या मंजुरीमुळे या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. वर्ष २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात अकोला- खंडवा-रतलाम या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉडगेज अशा गेज रूपांतरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून, यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.नऊ राज्य जोडली जाणार!अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे गेज रूपांतरण झाल्यावर हा रेल्वे मार्ग देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. या मार्गामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक ही राज्यही जोडली जाणार आहेत.

वन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच अकोला- खंडवा हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रूपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्यांतर्गत परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या अकोट ते आमला खुर्द या गेज रूपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच या मार्गावरील गेज रूपांतरणाच्या कामास सुरुवात होईल.-संजय धोत्रे, खासदार, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणSanjay Dhotreसंजय धोत्रे