Akola: अकोलामार्गे धावणार काचीगुड़ा-बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे 

By Atul.jaiswal | Published: May 4, 2023 11:37 AM2023-05-04T11:37:58+5:302023-05-04T11:38:13+5:30

Indian Railway: उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Akola: Kachiguda-Bikaner weekly special train will run via Akola | Akola: अकोलामार्गे धावणार काचीगुड़ा-बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे 

Akola: अकोलामार्गे धावणार काचीगुड़ा-बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे 

googlenewsNext

- अतुल जयस्वाल

अकोला - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने काचीगुडा ते बिकानेर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम-अकोला मार्गे जाणारी ही गाडी शनिवार, ६ मे पासून सुरु होणार असून ही सेवा आगामी २७ जूनपर्यंत सुरु राहणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

नांदेड विभाग प्रबंधक कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५३ (काचीगुड़ा-बीकानेर विशेष) ही गाडी शनिवार, ६ मेपासून आठवड्यातून दर शनिवारी रात्री ९:३० वाजता काचीगुडा येथून प्रस्थान करून सोमवारी दुपारी १:५० वाजता बिकानेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी आगामी २४ जूनपर्यंत धावणार आहे. अकोला स्थानकावर ही गाडी रविवारी सकाळी ९:२० वाजता येणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ (बीकानेर-काचीगुड़ा विशेष) ही गाडी ९ मेपासून आठवड्यातून दर मंगळवारी रात्री ८:१५ वाजता बिकानेर येथून रवाना होऊन गुरुवारी सकाळी ९:४० वाजता काचीगुडा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी बुधवारी रात्री ९:२५ वाजता अकोला स्थानकावर येईल. या गाडी प्रथमश्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीतसोबतच स्लिपर व जनरल डबे असणार आहेत.

Web Title: Akola: Kachiguda-Bikaner weekly special train will run via Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.