Akola: तेल्हारा येथून १२ लाखांचा गुटखा साठा जप्त

By सचिन राऊत | Updated: September 18, 2023 12:46 IST2023-09-18T12:46:00+5:302023-09-18T12:46:15+5:30

Akola: तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला.

Akola: Gutkha stock worth 12 lakh seized from Telhara | Akola: तेल्हारा येथून १२ लाखांचा गुटखा साठा जप्त

Akola: तेल्हारा येथून १२ लाखांचा गुटखा साठा जप्त

- सचिन राऊत
अकोला - तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.

तेल्हारा येथील रहिवासी रवि हरिचंद फुलवंदे व २९ वर्ष यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून रविवारी रात्री उशिरा फुलवंदे यांच्या घरात छापा टाकला. त्यानंतर त्याच्या घरातून प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा सुमारे १२ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. यावरून जिल्ह्यात गुटखा माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रितू खाेकर, सचिन जाधव, गजानन इंगळे, कादीर गवळी, संताेष मेहंगे, शेख सलमान, अभीजीत पांडे, गाैरव डाबेराव यांनी केली़

Web Title: Akola: Gutkha stock worth 12 lakh seized from Telhara