अकाेल्याच्या तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या

By आशीष गावंडे | Updated: May 28, 2024 21:58 IST2024-05-28T21:58:32+5:302024-05-28T21:58:48+5:30

मारेकरी युवकाचे पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण

Akola girl brutally murdered in Delhi | अकाेल्याच्या तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या

अकाेल्याच्या तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील एका ३० वर्षीय युवतीची दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात प्रियकराने चाकू भाेसकून व नंतर डाेक्यात सिलींडरने प्रहार करुन निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीची हत्या केल्यानंतर मारेकरी प्रियकराने टिकरी परिसरातील सदर पाेलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करुन गुन्ह्याची कबुली दिली. हत्येची घटना १८ मे राेजीच्या रात्री आठ वाजता झाल्याची माहिती आहे. 

सारीका वानखडे (वय ३०, रा.लक्ष्मी नगर डाबकी राेड अकाेला)असे हत्या झालेल्या युवतीचे नाव असून सुरज वर्मा (वय २३,रा.वानखडे नगर डाबकी राेड अकाेला)असे हत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. डाबकी राेड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाेघांमध्ये मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. परंतु मध्यंतरी त्यांचे बिनसल्यामुळे सारीकाने सुरज याच्या विराेधात पाेलिस तक्रार दाखल केली हाेती. नंतर या दाेघांत समेट झाल्यामुळे तीने पाेलिस तक्रार मागे घेतली हाेती.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुरज हा खासगी नाेकरीनिमीत्त पुण्याला निघून गेला. पुढे तेथून त्याची बदली दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात झाली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी सारीकाने सुरजसाेबत संपर्क साधून दिल्ली गाठली. भेटीदरम्यान १८ मे राेजी रात्री त्यांच्यात झालेला वाद विकाेपाला गेला. रागाच्या भरात सुरजने तीच्या डाेक्यात व गळ्यावर धारदार चाकूने अनेक वार केले. तसेच डाेक्यावर सिलींडरने प्रहार केले. या हल्ल्यात सारीका जागीच गतप्राण झाली.

...म्हणून तीला मारले
सारीकाची हत्या केल्यानंतर सुरजने टिकरी परिसरातील सदर पाेलिस ठाणे गाठले. व युवतीची हत्या केल्याची कबुली पाेलिसांना दिली. सारीकाकडून सतत पैशांची मागणी केली जात हाेती. पैसे न दिल्यास ती पाेलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्यामुळे तीचा खून केल्याची कबुली मारेकरी युवकाने सदर पाेलिस स्टेशनमध्ये दिली. याप्रकरणी सदर पाेलिस स्टेशनमध्ये सुरज वर्मा याच्या विराेधात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हत्येप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात संपर्क साधला. आम्ही दिल्ली येथील संबंधित पाेलिस स्टेशनसाेबत संपर्क केला. त्यानंतर तरुणीचे कुटुंबिय दिल्लीकडे रवाना झाले.
-सुरेंद्र बेलखेडे पाेलिस निरीक्षक, डाबकी रोड, अकोला

Web Title: Akola girl brutally murdered in Delhi