Akola: अकोला जिल्ह्यात सार्वात्रिक पाऊस; काही भागात मुसळधार! शेतकरी सुखावला, रखडलेल्या पेरण्यांना येणार वेग 

By रवी दामोदर | Published: June 23, 2024 07:31 PM2024-06-23T19:31:01+5:302024-06-23T19:32:07+5:30

Akola News: गत आठ दिवसांपासून विखुरत्या स्वरुपात असलेला पाऊस रविवारी सार्वात्रिक बरसला. काही भागात मुसळधार झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतेक भागात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.

Akola: General rainfall in Akola district; Heavy rain in some areas! Farmers are happy, stalled sowing will speed up  | Akola: अकोला जिल्ह्यात सार्वात्रिक पाऊस; काही भागात मुसळधार! शेतकरी सुखावला, रखडलेल्या पेरण्यांना येणार वेग 

Akola: अकोला जिल्ह्यात सार्वात्रिक पाऊस; काही भागात मुसळधार! शेतकरी सुखावला, रखडलेल्या पेरण्यांना येणार वेग 

- रवी दामोदर 
अकोला - गत आठ दिवसांपासून विखुरत्या स्वरुपात असलेला पाऊस रविवारी सार्वात्रिक बरसला. काही भागात मुसळधार झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतेक भागात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.

मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतीत होता. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने दमदार एण्ट्री केल्याने शेतकरी सुखावला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार रविवारी जिल्ह्यात सार्वात्रिक पाऊस बरसला. पाऊस झाल्याने खरिप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.

पठार नदीला पूर; पनोरी-दनोरी गावाचा संपर्क तुटला!
रेल येथून जवळच असलेल्या दनोरी-पनोरी गावालगतच्या पठार नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी असलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून, पनोरी गावचा मुख्य बाजार पेठेशीही संपर्क तुटला आहे.

Web Title: Akola: General rainfall in Akola district; Heavy rain in some areas! Farmers are happy, stalled sowing will speed up 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.