Akola: निलगायीच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी, वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्यावरील घटना
By रवी दामोदर | Updated: August 28, 2023 18:19 IST2023-08-28T18:18:27+5:302023-08-28T18:19:05+5:30
Akola: वाडेगाव, दिग्रस बु., सस्ती परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील काम आटोपून शेतकरी दुचाकीने घरी परतत असताना निलगायीने धडक दिली.

Akola: निलगायीच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी, वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्यावरील घटना
- रवी दामोदर
अकोला - वाडेगाव, दिग्रस बु., सस्ती परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील काम आटोपून शेतकरी दुचाकीने घरी परतत असताना निलगायीने धडक दिली. या अपघातातशेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.
पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील भारत गवई हे गंभीर जखमी झाले आहेत. दिवसभर शेतात राबून ते दुचाकीने वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्याने घरी परतत होते. अचानक निलगायीची धडक दुचाकीला बसल्याने दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.