शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

अकोला जिल्हय़ाला ‘सायबर क्राइम’चा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:03 IST

अकोला जिल्हय़ात तीन वर्षामध्ये २८ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दर महिन्याला कोणाच्या तरी एटीएममधून रोख रक्कम काढल्याच्या १0-१२ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे येतात. यावरून जिल्हय़ात सायबर क्राइम फोफावत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देगोपनीय माहिती देणे अंगलट आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल

अकोला : काही दिवसांपूर्वी बाश्रीटाकळी येथील श्याम ठक यांना एका मुलीने फोन करून, ती नोकरीसाठी अर्ज करीत असल्याने, स्वत:चा मोबाइल नंबर टाकताना, चुकून तुमचा नंबर टाकला आणि दोघांचाही नंबर मिळता-जुळता असल्याचे सांगत तिने त्यांना अर्ज पुढे पाठविण्यासाठी ओटीपी मागितला. तिची मधुर भाषा आणि आर्त विनवणीमुळे श्याम ठक तिच्या भूलथापांना बळी पडणार होते. तिला ओटीपी सांगणार, तेवढय़ात बँकेचा संदेश आला आणि त्यांना धक्काच बसला. माणुसकीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळल्या गेली. असेच काहीसे प्रकार अनेकांच्या बाबतीतसुद्धा घडले आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून अनेक जण तुमचे एटीएम बंद होणार आहे. पिन नंबर सांगा, असे विचारतात आणि नेमकी आपली तेथे फसगत होते. अकोला जिल्हय़ात तीन वर्षामध्ये २८ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दर महिन्याला कोणाच्या तरी एटीएममधून रोख रक्कम काढल्याच्या १0-१२ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे येतात. यावरून जिल्हय़ात सायबर क्राइम फोफावत असल्याचे दिसून येत आहे. 

चोरट्यांना पकडणे अवघड!सायबर गुन्ह्यांमध्ये संबंधितांना पकडणे खूप कठीण असते. ज्या खात्यावर पैसे टाकले जातात, ते खातेदेखील तात्पुरत्या स्वरूपाचे तयार केले जाते. दिवसाचे टार्गेट पूर्ण झाले की, ही मंडळी आपले बस्तान दुसरीकडे हलवतात.एखाद्याची फसवणूक झाल्यास त्याला त्याची रक्कम मिळणे गरजेचे असते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन   ३.५0 लाखांची रक्कम परत मिळविली गत सात-आठ महिन्यांमध्ये जिल्हय़ातील  अनेक तक्रारदारांचे बँकेतून बोलत असल्याचे सांगून आणि पिन नंबर मागून, बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून फसवणुकीचे अनेक प्रकार घडले. काहींच्या एटीएममधून रक्कम काढण्यात आली. या तक्रारदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींचा तपास करून आर्थिक गुन्हे शाखेने अनेक तक्रारदारांचे साडेतीन लाख रुपये परत आणून दिले. 

आमिषाला बळी पडू नका!झटपट o्रीमंत होण्याच्या आमिषामुळे अनेक जणांची फसवणूक होते. लॉटरी लागली आहे.  पैसे मिळणार आहेत, असे फोन आल्यावर माणूस मोहाला बळी पडू नये. तुमच्या खात्यातून पैसे अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्यास तत्काळ पोलिसांना कळविणे गरजेचे आहे.

मुलांकडेही लक्ष राहू द्याअनेक वेळा मोबाइलवरून मुले ऑनलाइन खरेदी किंवा विविध साइटस् बघत असतात. त्यामुळे आपली गोपनीय माहिती याद्वारे इतरांना जाण्याची दाट शक्यता असते. अनेक वेळा मुलांकडून इतरांना चुकीने मेसेज गेल्याची उदाहरणेही आहेत. मुलांच्या हातात मोबाइल असल्यावर किंवा ते इंटरनेटचा वापर करताना, नेमके काय करतात, याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ओटीपी नंबर कुणालाही देऊ नका!ऑनलाइन खरेदी करताना रजिस्टर केलेल्या नंबरवर ओटीपी नंबर येतो. हा नंबर ग्राहकांने कोणालाही कधीच सांगू नये. हा नंबर घेऊन अनेक जण ऑनलाइन पैसे काढण्याची शक्यत आहे.

एटीएम वापरताना काळजी घ्या!एटीएम वापर करणार्‍या व्यक्तीने ते वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आजूबाजूला कोणी व्यक्ती नाही ना, याची खबरदारी घ्यावी. आपले एटीएम कार्ड दुसर्‍या व्यक्तीला देऊ नये किंवा त्याचा क्रमांक व पासवर्ड कोणाला सांगू नये.

या वेबसाइट पाहाव्यात!इंटरनेचा वापर करताना आपण अनेक साइट्स पाहतो. या साइट्स पाहताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा साइट्स सुरू करण्यापूर्वी ँ३३स्र२//असे लिहिले आहे का?  ते पाहावे. या अक्षंरामधील ‘एस’ हे अक्षर ती साइट सुरक्षित असल्याचे दर्शवते, असे सायबरचे सहायक पोलीस निरीक्षक एम.बी. टाक यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बँकेतून कधीच फोन येत नाही!एटीएम कार्ड बंद होणार असल्याबाबत कधीच कोणतीही बँक ग्राहकाला स्वत:हून फोन करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे असे फोन हे केवळ ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच केले जातात. असा फोन आल्यास ग्राहकांनी माहिती देऊ नये. तत्काळ बँकेशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.

ऑनलाइन व्यवहार करतान सिक्युअर्ड साइटचाच वापर करावा. ब्राऊसरवर पासवर्ड वापरताना कधीही अँटो सेव्ह करू नये.  वारंवार पासवर्ड बदलण्याची सवय लावा. सार्वजनिक संगणकावर ऑनलाइन व्यवहार टाळावा. आपला मोबाइल क्रमांक, लकी क्रमांक म्हणून निवडल्याचे सांगून पैसे भरण्यास सांगण्यात येते. त्याला नागरिकांनी बळी पडू नये. कोणतीही बँक खातेदाराला कधीही एटीएमसंबंधी माहिती फोनवर विचारत नाही. कोणी फोनवर एटीएम क्रमांक, ओटीपी विचारत असेल सावध व्हा आणि एमटीएमचा पिन कार्डवर, चेकबुकवर लिहू नका. पासवर्ड हा स्वत:च्या, पत्नीच्या नावाने किंवा मोबाइल क्रमांक कधीही ठेवू नये. काही शंका असल्यास, नागरिकांनी तातडीने पोलिसांसोबत संपर्क साधावा. - प्रवीण धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा