अकोला : देहविक्री प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:47 AM2018-01-25T01:47:54+5:302018-01-25T01:48:07+5:30

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची ७ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली.

Akola: Deportation to the three prisoners of the case | अकोला : देहविक्री प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

अकोला : देहविक्री प्रकरणातील तिघांची कारागृहात रवानगी

Next
ठळक मुद्देजठारपेठेतील उच्चवस्तीत चालतोय गोरखधंदा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची ७ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली. यामध्ये ग्राहक शेख जावेद शेख लतीफ, विनोद शेषराव पांडे या दोघांसह हा व्यापार चालविणार्‍या दिवाकर नामक महिलेचा समावेश आहे.
 जठारपेठसारख्या उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळाली. बॉडी मसाजच्या नावाखाली या ठिकाणी देहव्यापार चालत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांचे पथक व सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख यांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दोन ग्राहक असून, हा व्यवसाय चालविणारी महिला व तीन युवतींचा समावेश आहे. महिलेविरुद्ध पिटा अँक्टच्या कलम ४,५,८  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तर तीन युवतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणातील महिला, आरोपी ग्राहक शेख जावेद शेख लतीफ व विनोद शेषराव पांडे या तिघांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

जठारपेठेतील उच्चवस्तीत चालतोय गोरखधंदा!
जठारपेठ हा शहरातील उच्च व प्रतिष्ठितांचा रहिवासी परिसर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, याच परिसरातील एका आलिशान घरामध्ये  देहव्यापार चालविण्यात येत होता. यामध्ये विनोद शेषराव पांडे व शेख जावेद शेख लतीफसारख्या मोठय़ा घरातील व्यक्तींचा सतत ग्राहक म्हणून वावर होता; मात्र पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर या व्यवसायाचा भंडाफोड झाला असून, विनोद पांडे व शेख जावेद सारख्या आंबट शौकिनांचाही चेहरा समोर आला.

Web Title: Akola: Deportation to the three prisoners of the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.