शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याच्या मृत्यू; घातपाताचा संशय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 02:10 IST

अकोला : पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिक्षण घेत असलेला पाच वर्षाचा चिमुकला स्कूलमधून घरी परतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर आली आहे.

ठळक मुद्देचिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिक्षण घेत असलेला पाच वर्षाचा चिमुकला स्कूलमधून घरी परतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर आली आहे. चिमुकल्याच्या डोक्यामध्ये रक्त गोठल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जुने शहर पोलिसांनी आता घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. मिर्झा अहमद रझा बेग हा चिमुकला नेहमीप्रमाणे शनिवार सकाळी ८ वाजता शाळेत गेला होता. दुपारी १२ वाजता घरी आल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. आई-वडिलांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्याच्या डोळ्याखाली लाल झाल्याचे व जखमा दिसून आल्या होत्या. चिमुकल्याच्या मृत्यूचा धक्का बसलेले आई-वडील तत्काळ जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली व मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर सर्वच प्रकार संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार गजानन पडघन यांनी मुलाचे शवविच्छेदन केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे ठरवले होते. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या डोक्यात रक्त गोठल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा तपासाचा रोख आता शाळेवर गेला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू