अकोला : अली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:24 AM2018-02-25T01:24:27+5:302018-02-25T01:24:27+5:30

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमधील एलकेजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Akola: A sudden death of a student of Ali Public School | अकोला : अली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

अकोला : अली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू

Next
ठळक मुद्देपातूर रोडवरील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनाचिमुकला एलकेजीमध्ये शिक्षण घेत होता

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमधील एलकेजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मिर्झा अहमद रझा बेग हा पाच वर्षीय मुलगा पातूर रोडवरील अली पब्लिक स्कूल येथे एलकेजीमध्ये शिक्षण घेतो. रोजप्रमाणे तो शनिवारी सकाळी ८ वाजता शाळेत गेला, त्यानंतर दुपारी १२ वाजता घरी परतला, घरी परतल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. आई-वडिलांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सदर प्रकरण गंभीर असल्याने त्याला सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. सदर चिमुकल्याची प्रकृती ठिक असतानाच अचानकच त्याचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाच्या डोळय़ाखाली लाल झाले असून, जखम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, चौकशीची मागणी केली आहे. यावरून जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून ठाणेदार गजानन पडघन यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Akola: A sudden death of a student of Ali Public School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.